धाराशिव हा आकांक्षी जिल्हा असणे हे पाटील कुटुंबीयाचे पाप पाडोळी, येवती, कोंड, टाकळी (ढोकी) येथील सभेतून खा. राजेनिंबाळकर यांचा घणाघात
मागील 40 वर्षामध्ये पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या विविध महत्वाच्या खात्याचे कॅबीनेट मंत्री राहिले होते. त्यानंतर त्यांनी याच मतदार संघाचे लोकसभेत 5 वर्ष खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. एवढया प्रदिर्घ काळामध्ये जिल्हयात कोणताही विकास न करता केवळ स्वत:चा विकास केला आहे. या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री, गृहमंत्री, जलसंधारण व पाटबंधारे मंत्री आदी महत्वाचे खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 1982 मध्ये धाराशिव जिल्हयासाठी मंजुर झालेले वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ येथे स्थलांतरीत करण्याचे पाप केले आहे. यानंतर त्यांच्या पुत्रांने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजुरी दिलेले वैद्यकीय महाविद्यालय खाजगी भागीदारी तत्वावर चालवण्यासाठीचा घाट घातला होता हे धाराशिवकर विसरलेले नाही. तसेच जिल्हयातील एखादयातरी शेतकऱ्याचा मुलगा नेरुळ येथील महाविद्यालयातील मोफत डॉक्टर केला आहे हे दाखवा. ज्या शेतकऱ्यांच्या ऊस बीलातील प्रतीटन 100 रु प्रमाणे कपात करुन तेरणा ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शेतकऱ्यांचा एकही मुलगा/ मुलगी डॉक्टर झाल्याचे ऐकवयात नाहीत. मात्र व्यवस्थापन कोटयातून परराज्यातील गडगंज लोकांची मुले डॉक्टर झाली आहेत. त्या विकास कामावर जसे बोलता तसे हे पाप कोणाचे आहे याची कबुली धाराशिवकरांसमोर द्यावी अन्यथा मतदार तुम्हाला मतपेटीतून जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
वडगाव शिवारातून जाणारा शक्तीपीठ महामार्गात बदल करुन तेरणा ट्रस्टच्या जमीनीतून कोणी वळवला ? याचे उत्तर द्यावे
मागील 40 वर्षात कोणताही विकास न केल्यामुळे धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षी जिल्हयाच्या यादीत तीन क्रमांकावर राहिला याच कालावधीमध्ये पद्मसिंह पाटील हे श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये देशभरातून तिसऱ्या क्रमांकावर होते. यातच धाराशिव जिल्हयाचा विकास का झाला नाही याचे उत्तर आहे.
विकासाचे कारण देत 2021 मध्ये शरदचंद्र पवार साहेबांची साथ सोडून भाजपात गेलेले राणाजगजितसिंह पाटील यांनी 5 वर्ष भाजपाची केंद्रात सत्ता असताना कोणता विकास केला व धाराशिव जिल्हयातील कोणाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस व्हाया भाजपा राष्ट्रवादी कॉग्रेस आजीत पवार गट हा द्रवीडी प्रणायाम कोणत्या विकासाठी आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,तालुकप्रमुख सतिश सोमाणी,डी.सी.सी.संचालक संजय देशमुख,दिपक खांडेकर विभाग प्रमुख, रवि कोरे आळणीकर,नंदू क्षिरसागर पं.स.सदस्य,राजाभाऊ भांगे विभाग प्रमुख,बाजिराव आप्पा गुंड,व्यंकट गुंड,काका बोचरे,बंकट बापु गुंड,सतिश जावळे,अक्षय बोंदर,दादा गाते,विष्णू अडसुळे,संजय पवार,सुरज इंगळे,काका पिंपरे,अमोल मस्के,भारत काटे,विष्णू ढवळे,उमाकांत ढवळे,मधूकर शिंदे,सागर कोळपे,देवा ढोरमारे,दाऊद तांबोळी,मनोज गुंड,उत्तम बोचरे उपस्थित होते. तसेच टाकळी (ढोकी) येथे नंदु क्षिरसागर, राजाभाऊ भांगे, नबी सय्यद, बालाजी ढगे, हामीद देशमुख, फुलचंद कुचेकर, महादेव जगदाळे, लखन बठनपुरे, तुकाराम ढेकरे, वैजीनाथ जगदाळे, कोंड येथे सुनिल शेटे, महादेव भोसले, वैजीनाथ शेटे, संतोष भोसले, प्रविण शिवलकर, झुंबर भोसले, कुमार परदेशी, शिवराज शेट्टी वाल्मीक जाधव बाळू भोसले आदी उपस्थीत होते.