धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधून सध्या जोरात आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या नेहमीच महिलांच्या स्वावलंबनासाठी अग्रेसर राहिल्या आहेत. अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद मधील उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून आणि अन्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचे वाण’ देणाचे कार्य केलेले आहे.
या विषयी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, हळदी-कुंकू हा उत्सव माता-भगिनींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.. शहरासह ग्रामीण भागातील महिलांमध्ये देखील एकता निर्माण व्हावी, गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा, त्यांच्यात विचारांची देवाण-घेवाण व्हावी व परस्परांमधील नात्यांचे बंध अधिक घट्ट व्हावे या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन आपण करीत असतो.
धाराशिव जिल्ह्यात शहरासह विविध तालुक्यांमधील सर्व गावांमध्ये मकर संक्रांती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गावातील हजारो महिला एका ठिकाणी, एका छताखाली येऊ शकतात.. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने महिलांना विविध वाण म्हणजेच भेटवस्तू देण्यात येतात. या वस्तूंमध्ये देखील महिला बचत गट आणि स्थानिक व्यवसायिकांकडून निर्माण केल्या गेलेल्या वस्तूंचेच वाण देण्यात येते!!
महिलांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ इत्यादींचे आयोजन देखील या माध्यमातून करण्यात येते.. अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू आणि सामाजिक, सांस्कृतिक महोत्सवात केवळ महिलाच नव्हे तर युवती, लहान मुली व अबाल वृद्ध नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. आयोजित करण्यात आलेले खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचा सर्वजण मनापासून आनंद घेतात. हा महोत्सव संपूर्ण गावाला एकतेच्या सूत्रात बांधत असतो..
या महोत्सवात संपूर्ण गावाला एकत्र करून ज्याची गावकऱ्यांना सहसा माहिती नसते अशा केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना, योजनांचा लाभ कसा घेता येऊ शकतो याची संपूर्ण माहिती दिली जाते.. त्यातूनच हजारो नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे..
अशा कार्यक्रमांमधून PMEGP व CMEGP योजना व इतर असंख्य योजनांची माहिती आपण शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविली आहे. ज्यातून धाराशिव जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा म्हणून पुढे येण्यास मदत झाली.. मनोरंजनाबरोबरच एकीकरण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचविणे हा व्यापक हेतू या महोत्सवाच्या आयोजनामागे असतो.. एकूणच विविध मार्गाने सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि त्याला नागरिकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद लाभत आला आहे, असे अर्चना पाटील यांनी सांगितले.