“ठाकरे सरकारने एक रूपयाचीही तरतुद केली नाही, मात्र महायुतीचं सरकार येताच..,”अर्चना पाटलांचा हल्लाबोल

Spread the love

धाराशीव : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार राणादादा पाटील यांनी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. सोलापुर-तुळजापुर-धाराशिव रेल्वे मार्गाला उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वाट्याच्या एक रूपयाची तरदूत केली नव्हती. मात्र राज्यात आपले महायुतीचे सरकार येताच हे काम मार्गी लागल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

अर्चना पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी काल तुळजापुर, इटकळ, शहापुर, जळकोट आणि नळदुर्गे भागात आपला प्रचार केला. त्यावेळी तुळजापुर येथे बोलत असतांनी त्यांनी राज्य सरकारच्या योजनांविषयी तसेच कामांविषयी माहिती देत असताना विकासाला हवा असेल तर घड्याळा शिवाय पर्याय नाही. असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प योजनेचे काम देखील प्रगतीपथावर आहे.. तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथ, उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर आपल्या तुळजापूरचा देखील विकास करायचा आहे. यासाठी केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यासाठी महायुतीचा खासदार असणे आवश्यक आहे.. आपल्या गतिमान राज्य सरकारने महिलांसाठी एस.टी.मध्ये ५० टक्क्यांची सूट दिली, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देश स्वच्छ केला, उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यामातून महिलांना मोफत गॅस दिला.. यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने घेतले..

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी ‘घड्याळ’ चिन्हावर बटन दाबून या भागातून मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!