धाराशिव : तक्रारदार – पुरुष, वय 42 वर्षे , आरोपी -1) देवानंद मरगु कांबळे वय 51 वर्षे , मंडळ अधिकारी (वर्ग-३), येरमाळा सर्कल, ता.कळंब, जि.धाराशीव. रा. राहुल माकुडे यांचे घरी किरायाने, ग्रीनलँड शाळेसमोर, आनंदनगर, धाराशिव. लाच मागणी पडताळणी :- दि. 27/03/2024 लाच स्विकारली – दि. 28/03/2024 लाचेची मागणी रक्कम – 4000/- रु0लाच स्विकारली रक्कम -4000/- रु
थोडक्यात हकिकत –
यातील तक्रार यांना मौजे चोराखळी येथील देवस्थान जमिन गट क्रमांक 639/1 मधील 50 ब्रास मुरूम रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणे बाबत सांगणे करिता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 4000/-रुपये लाचेची मागणी करून 4000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.
सापळा अधिकारी -विकास राठोड, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव मो. क्र. 7719058567
पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686
मार्गदर्शक – मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361
मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103
सापळा पथक – पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा , कार्यालय 02472 222879 , टोल फ्री क्रमांक.1064