धाराशिवः राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा लोकप्रिय कार्यक्रम होणार आहे. धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात सोमवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम रंगणार असून पैठणीसह भरगच्च आकर्षक बक्षिसांची मेजवाणी लाभणार आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर, अभिनेत्री सोनाली पाटील आणि बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून गृहिणींना, माता-भगिनींना काही आनंदाचे क्षण मिळावे, यासाठी या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात काही मजेदार बुद्धिवर्धक व आकर्षक खेळ, प्रश्नमंजुषा, उखाणे आदी भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. या कार्यक्रमाचे शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके यांनी दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस १५ मार्च रोजी आहे. महिला कुटुंबाचा कणा आहे. आपला संसार संभाळताना त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे मार्गदर्शक नामदार तानाजीराव सावंत हे नेहमीच महिलांचा आदर करतात आणि महिलांच्या महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे महिलांना रोजच्या कामातून वेळ मिळावा आणि या थोडा आनंदा घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके यांनी दिली. धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात सोमवारी (दि.११ मार्च) सायंकाळी ५ वाजता होम मिनीस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलांना भरगच्च पारितोषिके देण्यात येणार आहेत. कार्यक्रमात लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या तब्बल ३०१ पैठणी साड्या देण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक अशी भेट वस्तू देण्यात येणार आहे. कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास स्कुटी, दुसऱ्या क्रमांकास डबलडोअर फ्रीज, तिसऱ्या क्रमांकास स्मार्ट टिव्ही, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास वाशिंग मशिन तर लकी ड्रॉमधील विजेत्यांना पैठणीसह ३१ मिक्सर देण्यात येणार आहेत. धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात सोमवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजता हा सोहळा रंगणार असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी ९७६५२२११११, ८१०१२५२५२५, ९८८१५३२५९५, ८२०८०१९९७९, ९०२२४९८६३४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज (महाराज) साळुंखे यांनी केले आहे.