ना नवी दृष्टी ना नवे धोरण असा हा अर्थ “हीन संकल्प – आमदार कैलास घाडगे-पाटील
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं देशातला शेतकरी संकटात आहे. कृषी क्षेत्रामध्ये अभुतपुर्व प्रतिकुल स्थिती आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा सरकार करतं उत्पन्न निम्म व उत्पादन खर्च चाैपट झाले आहे. सरकारच आयात-निर्यात धोरण याला कारणीभूत आहे. मग अशावेळी एक सक्षम धोरण जाहीर होणं आवश्यक होतं. मात्र सरकारच्या डोळ्यासमोर आता निवडणुका दिसत असल्याने शेतकर्यापेक्षा त्यांचे प्राधान्य वेगळ असल्याच दाखवुन दिल आहे. सरकार दरबारी फक्त जुमलेबाजी सुरु आहे तर दुसर्या बाजुला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरु आहे. वाढती महागाई, बेरोजगार तरुणांचे वाढते प्रमाण याकडेही सरकारन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मोजक्या उद्योगपतीचा फायदा करुन देणार सरकार, नव उद्योजकांना मात्र संकटात टाकत आहे. जीएसटीच प्रमाण कमी करण्याची मागणी छोटा व्यावसायिक करत असताना त्यातही बदल न केल्यानं सामान्य नागरीकांच्या खिशाची लागलेली कात्री तशीच राहणार आहे. नव्या अर्थसंकल्पातून या सर्व प्रश्नाची सोडवणुक करणे आवश्यक होतं. मात्र नवे धोरण नाही वा नव्या उपाययोजना नाहीत. हा अर्थसंकल्प म्हणजे ना दृष्टी ना धोरण असाच म्हणाव लागेल. अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटातील आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.