धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या धाराशिव जिल्हा बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बीडला बदलली करण्यात आली आहे. धाराशिव शहरामध्ये गुटक्यावर कारवाई न करण्याच्या शर्तीवर शहर पोलीस स्टेशन मधील एका पोलिसास लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले होते यामध्ये शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे देखील सहभागी आहेत अशी लाच घेताना पकडलेल्या पोलीसाने तक्रारी मधे नोंद केली आहे . लाच घेणाऱ्या पोलिसावर कारवाई झाली मात्र गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तक्रारीप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित होते मात्र त्याप्रमाणे कारवाई झाली तर काय कारवाई झाली व कारवाई नाही झाली तर का नाही झाली असे अनेक प्रश्न शहरातील नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत. देर आये दुरुस्त आये याप्रमाणे किमान जिल्हा भाहेर बदली तरी झाली अशी चर्चा सध्या धाराशिव शहरांमध्ये रंगली आहे. लाचे संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रत खाली देण्यात आली आहे.
आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची बीडला करण्यात आली आहे. आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये मागील काळामध्ये प्रलंबित असलेले अनेक प्रलंबित विषय पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी मार्गी लावले आहेत. आनंद नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रोज आंदोलने उपोषणे विविध कार्यक्रम होतात त्या ठिकाणची बंदोबस्ताची सर्व जबाबदारी आंनद नगर पोलीस ठाण्याकडे असते पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्तम प्रमाणे जबाबदारी पोलिसांनी पार पाडली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांना स्थानिक गुन्हे शाखे ची जबाबदारी हवी होती मात्र ते न मिळाल्याने ते नाराज होते. व त्यांनी या अगोदर विविध ठिकाणी उत्तम कामगिरी पार पाडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदाची अपेक्षा केली होती. मात्र प्रशासनाने नियम अटीत बसत नसल्यामुळे त्यांना ते पद देण्यात आले नसल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली होती.
धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे , मटका जुगार , शहरात अनेक ठिकाणी अवैद्य मद्य विक्रीसुरू आहे. नवीन येणाऱ्या पोलीस निरीक्षक यांच्याकडे शहरवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नवीन येणाऱ्या पोलीस निरीक्षकानी तरी शहरातील अवैध धंद्यांवर आळा घालावा अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.