धाराशिव, दि. १२ (अंतरसंवाद न्यूज) – जिल्ह्यात वेगवेगळ्या चार भागांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीचे प्रकार समोर आले असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. नळदुर्ग : सासूला मारहाण, जीव घेण्याची धमकी
केशेगाव येथील श्रीकांत सिताराम जाधव याने प्लॉट विक्रीच्या वादातून आपल्या सासू गमाबाई यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. याप्रकरणी निर्मला जाधव यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. येरमाळा : हाताला चावा घेत मारहाण
कडकनाथवाडी येथे विकास भारत जगताप याने प्रमोद जगताप यांना विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्याच्या हाताला चावा घेतला. येरमाळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 333 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
३. तामलवाडी : चिंच फांद्या तोडण्याच्या कारणावरून मारहाण
काटी गावात चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरून अविनाश आणि आदेश आंबेकर यांनी चंद्रकांत क्षिरसागर यांना लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. तामलवाडी पोलीस ठाण्यात कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
४. परंडा : शेतीच्या वादातून हल्ला, लोखंडी रॉडचा वापर
परंडा शहरातील माळी गल्ली येथे शेतीच्या वादावरून दत्ता शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी ओंकार शिंदे आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
— ANTARSANWAD NEWS