धाराशिव, दि. १२ (प्रतिनिधी): शहरातील शौकत नरुद्दीन शेख यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश करून ‘घरवापसी’ केली असून, त्यांची धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता व भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील (जिल्हाप्रमुख), संपर्कप्रमुख सुनील काटमोरे व सहसंपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदू भैया राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शौकत शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी आमदार कैलास पाटील यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी पुढीलप्रमाणे होते:
दीपक जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, नाना घाटगे, अफरोज पिरजादे, तोफिक पठाण, शाखाप्रमुख सादिक सय्यद, परवेज काझी, संकेत सूर्यवंशी, हशमोद्दीन काझी, आयाज काझी, शाकीर शेख, मिलिंद पेठे, इम्तियाज बागवान, साबेर सय्यद, मुजीब काझी, गफार भाई, मोईन पठाण, शहबाज पठाण, कलीम कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शेख यांच्या या निवडीबद्दल शहरात व परिसरात सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.