Osmanabad 40 Loksabha election 2024
धाराशिव :
आज दि. 08/04/2024 रोजी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते लोकसभेसाठी नवनाथ सोपान जाधवर (बी.एस्सी अॅग्री) माजी बैंक कृषी अधिकारी व जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना यांची एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राम जीवन बोंदर, मार्गदर्शक प्रा. मारुती कारकर उपस्थिती होते. तसेच अमोल जाधव जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष ऊसतोड कामगार संघटना संतोष राठोड, महिला आघाडी संघटना उषा राठोड, जिल्हाध्यक्ष प्रफुल खैरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत पाटील, तालुकाध्यक्ष परंडा अशोक कारकर, तालुकाध्यक्ष सचिन खडके, तालुकाध्यक्ष भूम आबा गुंजाळ, तालुका उपाध्यक्ष धाराशिव नितीन घोगरे, तालुकाध्यक्ष कळंब सोमनाथ गवळी, राजाभाऊ कामठेकर, दिलदार शेख, सुजित बनसोडे, संग्राम जगताप, राजू कामठेकर, सुप्रिया जाधवर, संगिता खडके, मधुबाला पाटील आदि उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नवनाथ जाधवर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना , स्वतंत्र भारत पक्ष यांनी दिली आहे.