वयोवृद्ध भाविकांसाठी सेवाभाव: बुधवाणी कुटुंबाकडून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला इलेक्ट्रिक व्हीलचेअर अर्पण

Spread the love

धाराशिव :

गुलबर्गा (कर्नाटक) येथील रहिवासी असलेल्या स्वर्गीय अर्जुनराव बुधवाणी व चंद्राबाई बुधवाणी यांच्या स्मरणार्थ बुधवाणी कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला इलेक्ट्रिक व्हीलचेअर अर्पण केली.
देशभरातून दररोज हजारो भाविक श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये अनेक वयोवृद्ध तसेच शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचा समावेश असतो. या भाविकांना मंदिराच्या पायऱ्या चढणे-उतरणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी बुधवाणी कुटुंबीयांकडून ही इलेक्ट्रिक व्हीलचेअर अर्पण करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक व्हीलचेअर वृद्ध व अपंग भाविकांसाठी उपयुक्त ठरणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध व अपंग भाविकाला याचा लाभ मिळेल.
या सेवाभावासाठी मंदिर संस्थानच्या वतीने बुधवाणी कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, स्वच्छता निरीक्षक उमेश गुंजाळ, सुरज घुले, मनोज घोडगे, सहायक स्वच्छता निरीक्षक सुमित रघुजीवार, अक्षय साळुंखे, दयानंद जोगदंड, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, स्वच्छता पर्यवेक्षक प्रदीप सुरवसे, संगणक अभियंता सुधीर कदम, शुभम वायकोस तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!