
धाराशिव / धाराशिव
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियानांतर्गत निघालेल्या रथयात्रेचे धाराशिव शहरात बुधवारी (दि.२६) दुपारी जल्लोषात आगमन झाले. शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात समाजबांधवांनी या यात्रेचे पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व समाजाच्या बांधवांनी या रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी समाजबांधवांनी घोषणा देत रथयात्रेचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी अभिवादन केले. महात्मा जोतिबा फुले चौकात गेल्यानंतर महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. पुढे संत गाडगेबाबा चौकातही रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून रथयात्रा राजमाता जिजाऊ चौकात आली. यावेळी गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राजमाता जिजाऊ चौकात गृहिणी, महाविद्यालयीन तरुण, तरुणी आणि बालगोपालांनी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करत सहभाग घेतला. यावेळी सामुदायिक जिजाऊ वंदना घेण्यात आली आणि राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ही रथयात्रा पुढे छत्रपती शाहू महाराज चौकात गेली. तीन तासाच्या शहरातील प्रवासात घरोघरी रथयात्रेचे महिलांकडून पूजन करून स्वागत करण्यात आले. धाराशिव शहरातून या रथयात्रेचे कळंबकडे प्रस्थान झाले. यावेळी अध्यक्ष सौरभ खेडेकर, कार्याध्यक्ष प्रा. विजय तनपुरे, संदीपान जाधव प्रदेश उपाध्यक्ष, अशोक ठाकरे विभागीय अध्यक्ष, महेश भगत जिल्हाध्यक्ष सेवा संघ धाराशिव, ऍड. तानाजी चौधरी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, विजयकुमार पवार कार्याध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा रेखाताई पवार,
डॉ.वैशाली बलवंडे अध्यक्ष जिजाऊ जन्मोत्सव समिती धाराशिव, मंजुताई पाटील, नंदकुमार गवारे, मुकुंद घाडगे, बलराज रणदिवे, रोहित पडवळ, अभय इंगले, संदीप इंगले- अध्यक्ष मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती, आकाश मुंडे उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सुधीर सस्ते, अक्षय नाइकवाड़ी, संकेत सूर्यवंशी, केतन घाडगे यांच्यासह शहरातील महिला, मुली, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रेत सहभागी मंडळीचे सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, स्वराज्य संघटना, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले.