डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मुकुंद घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे

Spread the love


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मुकुंद घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे

पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक

धाराशिव –

बोधिसत्व विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद अर्जुनराव घुले यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची मिरवणूक 27 एप्रिल रोजी काढण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. यावेळी सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.

समितीच्या वतीने मागील ३० वर्षांपासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व जाती धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड, दिव्यांगांना मोफत सायकल यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

यावर्षीच्या जयंती समितीमध्ये देखील सर्व जातीधर्मातील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला असून अध्यक्षपदी मुकुंद अर्जूनराव घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे, उपाध्यक्ष खलील सय्यद, अर्जुन पवार, सचिव नाना घाटगे, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सहसचिव रावसाहेब शिंगाडे यांची निवड करण्यात आली. तर  संरक्षण प्रमुखपदी पांडुरंग भोसले, बंडू आदरकर, चंद्रकांत पांढरे, संतोष क्षीरसागर, संजय थोरात, विकी नाईकवाडी, संतोष वाघमारे, भूषण माने, कृष्णा भोसले, संजोग पवार, लखन जानराव, सम्राट वाघमारे, रोहित शिंगाडे, प्रमोद ठवळे, मिरवणूक प्रमुख सागर भास्कर, प्रतीक शिंगाडे, जितेंद्र बनसोडे, स्वप्निल शिंगाडे, लखन जानराव, अनिल शिंगाडे, सम्राट वाघमारे, कानिफनाथ गिरी, प्रीतम मुंडे, प्रशांत कांबळे, प्रज्ञावंत ओव्हाळ, बंटी शिंगाडे, राजपाल गायकवाड, विनोद रोकडे, मनीष बनसोडे सांस्कृतिक प्रमुख दयानंद साबळे, प्रेमानंद सपकाळ, यशवंत शिंगाडे, प्रसेंजित शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, अजय शिंगाडे, योगेश वाघमारे, सुगत सोनवणे,  योगेश वाघमारे, सत्यजित माने, सतीश ओहाळ, अविनाश शिंगाडे, प्रमुख सल्लागार परवेज काझी, राजेंद्र अत्रे, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, आबासाहेब सूर्यवंशी, संजय हंचाटे, विष्णू इंगळे, शकूर कुरेशी, इलियाज मुजावर, शंकर गोरे, अनिरुद्ध कावळे, आरेफ मुजावर, नितीन गायकवाड, किसन गुळवे, सरताज शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड.राकेश पवार, ॲड.भय्याजी साबणे,  कार्यकारिणी सदस्पपदी रवी कोरे आळणीकर, सतीश कदम, लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!