धाराशिव,दि.१८ फेब्रुवारी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.
श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माहे मार्च २०२५ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.
भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavanitempletrust.org यावर प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होती.
माहे मार्च २०२५ या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://shrituljabhavanitempletrust.org यावरून सिंहासन पूजा पास बुकिंग या मेन्यूवर क्लीक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे.ती २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
माहे मार्च -२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.