धाराशिव : जिल्ह्यात पाच ठिकाणी पोलिसांनी जुगार विरोधी कारवाई केली आहे यामध्ये धाराशिव शहरातील आनंदनगर भागांमध्ये दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव शहरात शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खुलेआम मटका जुगार सुरू आहे. मटका जुगारामुळे अनेक गरीब नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जुगार चालवणाऱ्यांना नेमकं कोण पाठबळ कोण देतं पाठबळ देणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला ही प्रसारमाध्यमांशी बोलताना नागरिकांनी दिला आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीत ठिकाणी कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी झालेली कारवाई खालील प्रमाणे..
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.28.02.2024 रोजी 14.30 ते 19.10 वा. सु. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)राहुल तात्याबा ओव्हाळ, वय 39वर्षे, रा. भिमनगर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. येडेश्वरी मंदीर कमानी समोरील पानटपरी समोर येरमाळा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 860 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.तर आरोपी नामे 2)विनोद रमेश पवार, वय 24 वर्षे, रा. वडर गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 19.10 वा. सु. बसस्थानक येरमाळा जवळील कंपाउुन्डच्या शेजारी मुंबई मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,130 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.28.02.2024 रोजी 12.30 वा. सु. आनंदनगर पोठा हद्दीत तुळजाभवानी स्टेडीअम जवळीलओम हॉटेलच्या जवळ रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पांडुरंग विठ्ठल जाधव, वय 45 वर्षे, रा. जाधववाडी ता. जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. तुळजाभवानी स्टेडीअम जवळील ओम हॉटेलच्या जवळ रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,130 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने: जुगार विरोधी कारवाई दरम्यान अंबी पोलीसांनी दि.28.02.2024 रोजी 18.00 वा. सु. अंबी पोठा हद्दीत अंबी बसस्थानक जवळ हॉटेल अंबीका येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)इरुान दाउद पठाण, वय 24 वर्षे, रा. अंबी ता. परंडा ह.मु. अंबी ता. परंडा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. अंबी बसस्थानक जवळ हॉटेल अंबीका येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये अंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.28.02.2024 रोजी 16.30 वा. सु. वाशी पोठा हद्दीत वाशी फाटा येथील पोलीस वायरलेस ऑफीसच्या पाठीमागे डोंगराच्या कडेला झाडाखाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सुनिल आनंता चंदनशिवे, वय 31 वर्षे, 2) बाळासाहेब दशरथ गायकवाड, वय 30 वर्षे, 3) नानासाहेब सोमनाथ हाके, वय 33 वर्षे 4) अनिल सतिष चंदनशिवे वय 30 वर्षे, रा. रामकुंड ता. भुम जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. वाशी फाटा येथील पोलीस वायरलेस ऑफीसच्या पाठीमागे डोंगराच्या कडेला झाडाखाली तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 18,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
खुप तत्परता दाखवली पोलिसांनी अशीच तत्परता हातभट्टी व इतर अवैध धंद्यांवरती हि कार्यवाही करुन तत्परता दाखवावी धाराशिव शहरात आणि जिल्ह्यत हातभट्टी व इतर अवैध धंदे जोरात चालु आहेत.